पुण्यातील कल्याणी नगर भागात मद्यधुंद अवस्थेत कर चालवून एका अल्पवयीन मुलाने दोघांना उडवले होते. या पूर्वी मुलाने एका पब मध्ये कोझी बार मध्ये बसून मित्रांसोबत पार्टी केली होती. पुणे हिट अँड रन प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोझी बार आणि ब्लॅक पब वर मोठी कारवाई करत दोन्ही सील केले आहे. या बार मध्ये राज्य उत्पादन विभागाचे अधिकारी तपास करत आहे.
अल्पवयीन मुलाला मद्य विकण्याचा गुन्हा दाखल करत या बार वर ही कारवाई करण्यात आली आहे. बार मालकाला अटक करण्यात आली असून त्यांना कोरत्ने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राज्य उत्पादन विभागाने या बार ला सील केले असून आता हे बारची मद्य विक्री बंद करण्यात आली असून आता या बार मधून मद्य विक्री केली जाणार नाही. पुढील आदेश येई पर्यंत या बारचे व्यवहार बंद राहतील. अशी माहिती पोलिसांनी दिली.
बार मालक आणि पब मालकाला अटक केली असून न्यायालयात हजर केले असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे सत्र न्यायालयाचे सर न्यायाधीश एस.पी.पोंक्षे यांनी हा आदेश दिला.