Publish Date: Thu, 09 Dec 2021 (21:54 IST)
Updated Date: Thu, 09 Dec 2021 (21:58 IST)
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात एट्रॉसीटीचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी कोथरुडमधील त्यांच्या प्रभागातील सार्वजनिक शौचालय ठेकेदार असलेल्या त्यांच्या भाच्याच्या मदतीने तोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
कोथरुडच्या भीमनगर भागातील नागरिक ते रहात असलेली जागा सोडून जावेत आणि त्याठिकाणी दुसरा गृहप्रकल्प उभारता यावा यासाठी महापौरांनी सार्वजनिक शौचालय तोडल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
देवीदास ओव्हाळ नावाच्या व्यक्तीने याबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश पोलीसांना दिलेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांना याबाबत विचारलं असता आपण सर्व माहिती घेऊन आपली बाजू मांडू असं त्यांनी म्हटल आहे.