मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवे वर केमिकल घेऊन जाणाऱ्या टँकर ने पेट घेतला. ही घटना मंगळवारी सकाळी 12 च्या सुमारास खंडाळा एक्झिट जवळ घडून या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर तीघे गंभीर जखमी झाले आहे.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा एक्झिट जवळ उड्डाण पुलावर टॅंकरचा अपघात होऊन ऑइल टँकरने पेट घेतला. आगी ने रौद्र रूप धारण केले आगीचे लोट पुलावर खाली पडले दरम्यान पुला खालून जाणाऱ्या एका दुचाकीवर आगीचे लोट पडल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला तर टँकर जवळ एकाचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीररीत्या भाजले आहे. टँकरने पेट घेतल्यावर आगीचे लोट पुला खाली पडल्याने पुलाच्या खाली पार्क केलेले वाहन देखील जळून खाक झाल्या आहेत.
अपघात कशामुळे घेतला अद्याप माहिती मिळाली नाही. पुलावर ऑइल टँकरला आग लागण्याचे व्हिडीओ समोर आले आहे. आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
अपघातात टँकर चालक जागीच ठार झाला तर क्लिनर जखमी झाला आहे.
अपघातानंतर वाहतूक कोंडी होऊन मुंबईकडे जाणाऱ्या वाहतूक बंद करण्यात आल्या होत्या आता वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास पोलीस लावत आहे. .