Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे : राज्यातील सात साखर कारखान्यांना आरआरसीनुसार नोटिसा

sugar cane
, सोमवार, 31 जुलै 2023 (08:26 IST)
राज्य साखर आयुक्तालयाने राज्यभरातील सात साखर कारखान्यांना आरआरसीनुसार नोटिसा बजावल्या आहेत. सत्तर टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे हे कारखाने असून, त्यांनी एकूण १४,५०३.५९ लाख आरआरसी रक्कम थकवली आहे. यात प्रामुख्याने राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आल्याचे दिसून येते.

साखर कारखाने, त्यांची थकीत आरआरसी रक्कम व या कारखान्यांचे राजकीय संबंध पुढीलप्रमाणे : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, पंढरपूर, आरआरसी रक्कम ३६७४.९० लाख (संबंधित राजकीय नेते : कल्याणराव काळे, राष्ट्रवादी), राजगड सहकारी साखर कारखाना लि. भोर, आरआरसी रक्कम २५९१.६९ लाख (आमदार संग्राम थोपटे, काँग्रेस), अंबेजोगाई सहकारी साखर कारखाना, अंबेजोगाई आरआरसी रक्कम ८१४.१५ (धनंजय मुंडे, राष्ट्रवादी), वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी, आरआरसीसी रक्कम ४६१५.७५ लाख (पंकजा मुंडे, भाजप), जयलक्ष्मी शुगर प्रो. नितळी, आरआरसी रक्कम ३४०.६९ लाख (विजयकुमार दांडनाईक, भाजप), किसनवीर ससाका भुईंज, सातारा, आरआरसी रक्कम ४११.९१ लाख (आमदार मकरंद पाटील , राष्ट्रवादी), साईकृपा साखर कारखाना, हरिडगाव, अहमदनगर, आरआरसी रक्कम २०५४.५० लाख (आमदार बबनराव पाचपुते, भाजप).

Edited By - Ratnadeep ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक : गोदावरी नदीच्या सुरक्षेसाठी आता पोलीस बंदोबस्त