पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी सोमवारी मोठा खुलासा झाला.17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्श कार ने धडक देऊन दोघांना ठार केले. याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये तो एका पब मध्ये बसून सेलिब्रेशन करत असून दारूच्या बाटल्यांचा ढीग दिसत आहे.आरोपीने मित्रांसोबत बारावीचा निकाल साजरा केला.अपघाताच्या वेळी हा आरोपी मंदधुंद अवस्थेत असून गाडी चालवत होता. अपघातात ठार झालेले पुरुष आणि महिला हे दोघे मध्यप्रदेशातील असून पुण्यात कार्यरत होते.
सदर घटना शनिवारी दुपारी सवा दोन वीजेची आहे. वेगाने धावणाऱ्या पोर्श कार ने अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्ठा यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते दोघे जागीच ठार झाले. या प्रकरणात अल्पवयीन आरोपी तरुणाला अटक केली. नंतर त्याला 15 तासात जामीन मिळाला.
अल्पवयीन व्यक्तीवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार तसेच महाराष्ट्र मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार बेपर्वाईने वाहन चालवण्याचा आणि जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणून हानी पोहोचवल्याचा आरोप केला.
पोलीस आयुक्तांनी सांगितले की, मुलगा दारूच्या नशेत गाडी चालवत होता हे स्पष्ट झाले आहे. अनेक साक्षीदारांनी सांगितले की किशोर आणि त्याचे मित्र खूप मद्यधुंद होते. आता मुलाचे वडील आणि त्याला दारू पुरवणाऱ्या पबच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.