पुणे हे शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं, मात्र आता शिक्षणाची नगरी की, जादू टोण्याची नगरी असा प्रश्न निर्माण झाला आहे. पैशांचा पाऊस पडतो म्हणून पुण्यातील हडपसर परिसरातील एका तरुणाला मांत्रिकाने तब्बल अठरा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातील हडपसर परिसरात असलेल्या ससाणे नगर येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पाच लाखाचे पैसे बदलून कोट्यावधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पडतो असे सांगत मांत्रिकाने तरुणाला 18 लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी विनोद छोटेलाल परदेशी यांना त्यांच्या मित्रमार्फत एका भोंदू बाबा याच्याशी ओळख झाली. त्याने पैशाचा पाऊस पडतो असे सांगून फिर्यादी यांना एक अघोरी पूजा मांडायला सांगितली.
दरम्यान पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही तोतया पोलीस आले. त्यांनी बाबासाह तरुणाला मारहाण करत या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले 18 लाख रुपये घेऊन पसार झाले. हा सगळा डाव या भोंदू बाबाने रचला असल्याचे समजताच फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी आता या भोंदू बाबासह तिघांचा शोध पोलीस घेत आहेत
या प्रकरणी भोंदू बाबा आईरा शॉब यांच्यासह माधुरी मोरे , रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे अशा चार जणांवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान असे प्रकार वारंवार समोर येत आहेत. तर अशी गोष्टींना बळी बडू नका असे आवाहन पोलीस आणि अंधश्रध्दा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे.
Edited by -Ratnadeep Ranshoor