Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे: अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे: अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पुणे , सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (18:58 IST)
पुण्यात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालक (auto rickshaw driver) आणि त्याच्या रेल्वेच्या कर्मचारी (railway workers) असलेल्या कामगारांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्टला गावी जाण्यासाठी मुलगी पुणे स्टेशन येथे आली होती. मात्र आता रात्री गाडी नसून तुझ्या राहण्याची व्यवस्था करतो, असं सांगून रिक्षाचालकाने तिला विश्वासात घेतलं आणि वानवडी येथे नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला.
 
तसंच तिला तिथेच डांबून ठेवण्यात आल्याने एक तारखेला पुन्हा रेल्वेचे कर्मचारी असलेल्या 2 चतुर्थश्रेणी कामगारांनी तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. पीडित अल्पवयीन मुलगी ही रुग्णालयात असून सध्या तिची परिस्थिती गंभीर आहे, परंतु स्थिर आहे. पीडित 13 वर्षीय मुलगी आई वडिलांसोबत वानवडीमध्ये राहते. 31 ऑगस्टच्या रात्री तिचा मित्र गावाहून तिला भेटण्यासाठी पुणे स्टेशनला येणार होता म्हणून ती पुणे स्टेशनला गेली होती. मात्र तिचा मित्र आलाच नाही. त्यानंतर तिने बाहेर उभ्या असलेल्या रिक्षा चालकाला पुन्हा गाडी आहे का? याची विचारणा करण्यासाठी गेली असता त्याने तिला घरी सोडण्याचा बहाणाकरून रिक्षात बसवून घेऊन गेला. त्यानंतर त्या रिक्षाचालकाने काही मित्रांना फोन करून बोलवून घेतलं आणि त्यानंतर दोन दिवस या मुलीवर अत्याचार केला गेला. यात 6 रिक्षाचालक आणि दोन रेल्वे चे कर्मचारी यांनी अत्याचार केला. या मुलीला मुंबईच्या बसमध्ये बसवून देण्यात आलं होतं. त्यादरम्यान पुन्हा आणखी या मुलीवर कुणी अत्याचार केलाय का याचा तपास पोलीस करत आहेत. या मुलीची तब्येत स्थिर असल्याचं उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितलं आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निपाह विषाणू मानवापर्यंत कसा पोहोचला? केरळमधील बाधित मुलाच्या संपर्कात आलेल्या शेळीचे नमुने घेतले