लाच घेणं आणि देणं दोन्ही गुन्हा आहे. पुण्यात दोन वाहतूक पोलिसांना एका दुचाकीस्वारांकडून लाच घेणं महागात पडलं हे संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. या प्रकरणाचं व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
सदर घटना 17 मे ची आहे. स्वारगेट वाहतूक विभाग, पुणे, महाराष्ट्र अंतर्गत गंगाधाम मंदिर मार्गावर एका दुचाकीस्वाराला वाहतुकीचे उल्लंघन केल्याबद्द्दल दोन वाहतूक पोलिसांनी अडवलं नंतर त्या दुचाकीस्वाराकडून लाच घेत असताना संपूर्ण प्रकरण सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाले.या व्हिडीओ मध्ये वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वाराकडून पैसे घेतले मात्र त्याला पावती दिली नाही. नंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पुणे वाहतूक डीसीपींनी दोन्ही पॊलिसांच दुचाकीस्वाराकडून लाच घेण्या प्रकरणी त्यांचं निलंबन केले