Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जूगार अड्ड्यावर छापा, भाजप नगरसेविकेच्या पतीचा समावेश

जूगार अड्ड्यावर छापा, भाजप नगरसेविकेच्या पतीचा समावेश
, गुरूवार, 11 मार्च 2021 (07:50 IST)
पिंपरी पडवळनगर, थेरगाव येथे एका घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्यात पोलिसांनी आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीचा देखील समावेश आहे.
 
मुरली ईश्वरदास येलवाणी (वय 65, रा. काळेवाडी), विनोद यशवंत मिरगणे (वय 38, रा. थेरगाव), शहाजी मधुकर पाटील (वय 48, रा. वाकड), समीर अकबर अत्तार (वय 36, रा. थेरगाव), प्रमोद प्रकाश पवार (रा. पडवळनगर, थेरगाव), बाळू जानराव (वय 35, रा. वाल्हेकरवाडी), विनोद जाधव (वय 30), राजस्थानी मारवाडी (पूर्ण नाव माहिती नाही, रा. पडवळनगर, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडवळनगर, थेरगाव येथे राजस्थानी मारवाडी व्यक्तीच्या घरी जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि. 7) दुपारी पाच वाजता छापा मारला असता राजस्थानी मारवाडी व्यक्तीच्या घरात विनापरवाना, बेकायदेशीरपणे 13 पत्त्यांचा रम्मी नावाचा जुगार सुरु असल्याचे निदर्शनास आले. मास्क न वापरता एकत्र जमून कोरोना संसर्ग पसरविण्यास पोषक वातावरण निर्माण केले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
 
याबाबत भारतीय दंड विधान कलम 188, 269, 34, साथीचे रोग अधिनियम 1997 चे कलम 3, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 (ब), महाराष्ट्र कोविड 19 विनियम 2020 कलम 11, महाराष्ट्र जुगार अॅक्ट कलम 4, 5, 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, प्रमोद पवार हा भाजप नगरसेविका मनीषा पवार यांचा पती आहे. मनीषा पवार या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पोलीस आयुक्तांची दणकेबाज कारवाई; शहरातील दोन कुंटणखाने ‘सील’