Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

राज ठाकरे भडकले; जगू द्याल की नाही ...!

raj thackeray
, बुधवार, 18 मे 2022 (10:20 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.ते आता अयोध्या दौरेमुळे चर्चेत आहेत. ते जिथे जातील त्यांच्या मागे माध्यमांचे कॅमेरे मागावरच असतात. काल  ते पुण्यात अभिनव चौकात अक्षरधारा बुक गॅलरीत एका दुकानात भेट देण्यासाठी आले असता प्रसार माध्यमांवर संतापले. पसार माध्यमांच्या कॅमेऱ्याच्या लाईट लावल्या होत्या. त्याचा त्रास राज ठाकरे याना होत असताना त्यांनी फॉक्स लाईट बंद करायला लावला आणि जगू द्याल की नाही असं म्हणत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना चांगलंच सुनावलं. 

सध्या राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर आहे. मंगळवारी त्यांनी सायंकाळी अभिनवचौकातील अक्षरधारा बुक गॅलरीमध्ये भेट दिली आणि त्या दुकानातील काही पुस्तके चाळुन अनेक पुस्तके विकत घेतली. त्यांच्या येण्याच्या पूर्वीच प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी केमेऱ्यासह तिथे उपस्थित होते. त्यांच्या कॅमेऱ्यांच्या लाईट आणि फोकसचा त्रास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना होऊ लागला आणि जगू द्याल की नाही असं म्हणत ते माध्यमांच्या प्रतिनिधींवर संतापले. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्येष्ठ नेते मधुकर शेवाळे यांचे निधन