Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राईड रद्द केल्यावरून गदारोळ: पुण्यात पाच जणांचा रॅपिडो चालकावर हल्ला; दगडांनी मारून केले जखमी

राईड रद्द केल्यावरून गदारोळ: पुण्यात ६ जणांचा रॅपिडो चालकावर हल्ला; दगडांनी मारून केले जखमी
पुण्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राईड रद्द केल्याच्या कारणावरून एका 'रॅपिडो' चालकाचा आणि काही व्यक्तींच्या गटाचा वाद झाला. भाड्यावरून सुरू असलेला हा वाद विकोपाला गेल्यावर, पाच जणांनी त्या 'रॅपिडो' चालकावर निर्घृण हल्ला केला. त्यांनी चालकाला त्याच्या वाहनातून बाहेर ओढून काढले आणि दगडांनी मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले.
 
पुण्यातील लोणी काळभोर येथील साई सृष्टी अपार्टमेंटजवळ ही घटना घडली. रॅपिडो चालक श्रीकृष्ण मधुकर लाड (वय ३०) यांना राइड बुकिंग मिळाली. ते ठिकाणी पोहोचल्यावर एक तरुण आणि चार महिलांसह गाडीत बसण्यासाठी आले. 

ड्रायव्हरने सुरुवातीला विरोध दर्शवला, कारण नियमांनुसार मागील सीटवर फक्त तीन जण बसू शकतात. मात्र प्रवाशांच्या आग्रहामुळे त्यांना बसण्याची परवानगी दिली. त्यानंतर किरायाच्या मुद्द्यावरून जोरदार वाद सुरू झाला.
 
ड्रायव्हरने सांगितले की, वाढत्या इंधन दर आणि ड्रायव्हर संघटनेच्या नियमांनुसार प्रति किलोमीटर २५ रुपये किराया असावा. मात्र प्रवाशांनी रॅपिडो अॅपमध्ये दाखवलेल्या किरायावरच आग्रह धरला. वाद चिघळल्याने प्रवाशांनी राइड रद्द केली.
 
काही वेळाने ते सर्वजण परत आले. तेव्हा लाड दुसऱ्या राइडची वाट पाहत होते. त्यांनी ड्रायव्हरला घेराव घातला आणि पुन्हा बहस सुरू केली. एका तरुणाने लाड यांना गाडीतून बाहेर ओढले आणि मारहाण सुरू केली. त्यानंतर चारही महिलांनी देखील हल्ला चढवला.

एका महिलेनं मोठा दगड उचलला आणि ड्रायव्हरच्या डोक्यात जोरात मारला. यामुळे श्रीकृष्ण लाड गंभीर जखमी झाले. ते रक्तबंबाळ झाले. आसपासच्या लोकांनी धावून जाऊन ड्रायव्हरला वाचवले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले.
 
पोलिस कारवाई
पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींपैकी काहीजण कॉलेज स्टुडंट असल्याचे सांगितले जाते. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याच्यावरून आरोपींची ओळख पटवली गेली आहे. पोलिसांनी सांगितले की, तपास सुरू आहे आणि लवकरच सर्व आरोपींना नोटीस बजावण्यात येईल. अद्याप कोणतीही अटक झालेली नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुकुल चौधरी कोण आहे? ज्याने षटकारांचा वर्षाव करत कोलकाता विरुद्ध खेचून आणला विजय, सोशल मीडियावर नवा 'टायगर' म्हणून ट्रेंडिंग