पुण्यात रोडरेजची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेने एका वृद्ध व्यक्तीच्या कारला ओव्हरटेक न करू दिल्यामुळे व्यक्तीने तिच्या नाकावर ठोसा मारला आणि तिचे केस ओढले.
पुण्यातील पाषाण-बाणेर लिंकरोड वर ही घटना घडली असून या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. स्वप्नील केकरे असे या आरोपीचे नाव आहे.
सदर घटना पाषाण-बाणेर मार्गावर घडली आहे. 27 वर्षीय महिला आपल्या मुलांसह दुचाकीने जात असताना एका चारचाकी वाहन चालकाला ओव्हरटेक न करू दिल्यामुळे वाहन चालक संतापला आणि त्यांनी बाहेर येऊन महिलेला मारहाण केली. महिलेच्या नाकावर ठोसा मारला. या मारहाणीत महिलेने जखमी अवस्थेतील व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केला. यानंतर पोलीस सक्रिय झाले आणि स्वप्नील केकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेने व्हिडीओ मध्ये दावा केला की आरोपीने तिला मारहाण केली तिचे केस ओढले आणि नाकावर ठोसा मारला. आणि पळून गेला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.