Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरपीआय है ना, मनसे के पीछे क्यू पडे हो? रामदास आठवलेंचा भाजपला सवाल

आरपीआय है ना, मनसे के पीछे क्यू पडे हो? रामदास आठवलेंचा भाजपला सवाल
, बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (08:04 IST)
पुणे: राज्यात महापालिका निवडणुकीत आम्ही भाजपसोबत राहणार आहोत. रिपाइंला पुण्याचं महापौरपद मिळालं पाहिजे. मुबंईमध्ये उपमहापौरपद मिळाले पाहिजे. पुण्यात १५ ते २० तर मुंबईमध्ये ३० ते ३५ जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली. आरपीआय असताना भाजपला मनसेची गरज नाही. मनसेमुळे भाजपचं नुकसान होऊ शकतं. त्याचा परप्रांतीय मुद्दा बघून भाजपने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये. आम्ही भाजपचा नाद सोडला तर ते आमचा नाद सोडणार नाहीत, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात सांगितले.
 
माझ्या पक्षाच मत जयेश शहा यांना सांगेन. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये. खेळामध्ये राजकारण अणू नये हे खरं आहे. पण अशा परिस्थितीत खेळू नये. पण अशा परिस्थितीत २४ तारखेला होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-ट्वेन्टी सामना होऊ नये अशी आमच्या पक्षाच्या भूमिका आहे, मात्र, पाकिस्तानसोबत एक तरी लढाई झाली पाहिजे, अशी इच्छा आठवले यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या मुद्द्यावर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी लवकरच चर्चा करणार आहेत.
 
अनेकजण उद्योग करण्यासाठी जम्मू काश्मीर मध्ये येत असतात त्यांना आतंकवादी मारत आहेत. पाकिस्तानवर एकदा सर्जिकल स्टारईक करायला लागेल. पाकिस्तानने हल्ले थांबवले पाहिजेत. त्यांना विकास करायचा असेल तर आतंकवादी कारवाई थांबवून पाक व्याप्त जम्मू भारताच्या ताब्यात द्यायला हवा. नाही तर एकदा पाकशी आरपार लढाई करायला लागेल, पाकिस्ताचे फार लाड करून चालणार नाही, असं सांगतानाच पाकिस्तान या विषयावर मी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
 
सरकारला अस्थिर करण्याची गरज नाही. पाच वर्षे तुम्हीच सत्तेत राहा. त्यानंतर मात्र आम्हीच सत्तेत येणार आहोत. सरकार पाडायचं असतं तर वर्षभरापूर्वी सरकार पाडलं असतं, असं साांगतानाच ईडी आणि सीबीआय या यंत्रणा स्वंतत्र आहेत. त्यांच्या कारवाईचा भाजपशी काहीच संबंध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WhatsApp वर टेलिग्राम भारी पडू शकते, आतापर्यंत 100 कोटीहून अधिक लोकांचे डाउनलोड