Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

Schools
, सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (08:21 IST)
कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापालिकेनं शहरातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या निर्णयाची माहिती दिली.  येत्या १३ डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल आणि त्याआधी पालकांशी चर्चा केली जाईल, असं मोहोळ म्हणाले. पुणे महापालिकेपाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकादेखील असाच निर्णय घेतला आहे. 
 
वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईसह ठाणे जिल्हा आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळा सध्या सुरू होणार नाहीत, असे आदेश स्थानिक प्रशासनाकडून शुक्रवारी देण्यात आले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ज्यादिवशी पवारांना वाटेल तेव्हा त्यांनी सुप्रिया सुळेना मुख्यमंत्री करावे : चंद्रकांत पाटील