Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपचे ज्येष्ठ नेते पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन
, बुधवार, 29 मार्च 2023 (12:59 IST)
भाजपचे पुण्याचे खासदार ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गिरीश बापट यांचं पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. ते 73 वर्षाचे होते. ते गेल्यावर्षापासून फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. आजारी असताना देखील कसबा पोटनिवडणुकीत त्यांनी प्रचार केला. ते महाराष्ट्राच्या 13 व्या विधानसभेचे सदस्य होते. कसबा पेठ मतदारसंघातून ते निवडून आले होते. त्यांची 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवड झाली. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली होती. नुकतंच त्यांचं निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. कसबापेठ भाजपचा बालेकिल्ला असून याला घडवायचे कार्य देखील बापटांनी केले होते. गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सातच्या सुमारास वैकुंठ समशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. 
 
Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक