पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ महिलेच्या नावावर17 गुन्हे दाखल असल्याचे सांगत महिलेची एक कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली हा प्रकार 21 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला असल्याची माहिती समोर येत आहे.
याप्रकरणी 67 वर्षीय महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद (Online Fraud) दिली आहे.आणि मोबाईल वरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला आरोपींनी वेगवेगळया मोबाईल नंबरद्वारे, व्हॉट्सअप कॉल व व्हिडीओ कॉलवरुन बोलणाऱ्या लोकांनी पोलीसअसल्याचे भासवले. नंतर त्यांच्या विरोधात गंभीर तक्रारी असल्याची भीती दाखवत त्यांच्या कडून पैश्यांची मागणी केली.
तसेच नरेश गोयल मनी लॉंड्रिंग केसमधील दोन करोड रुपयाचे दरमहिना 10 टक्के कमिशन जवळपास 20 लाख रुपये मिळाले असल्याचे सांगितले. त्यामध्ये फिर्यादी महिलेला अटक होण्याची भीती घालून वेगवेगळ्या बँक अकाऊंटवर जबरदस्तीने एकूण एक कोटी 14 लाख 20हजार 188 रुपये भरण्यास सांगितले आणि पैसे लुबाडले. महिलांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसठाण्यात तक्रार केली. सायबर पोलीस या प्रकरणात तपास करत आहे.