बदलापूर प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडी कडून राज्यभरात ठिकठिकाणी मूक आंदोलन केले जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तोंडावर काळी पाटी बांधून महाराष्ट्रात निषेध आंदोलन केले आहे.
या पूर्वी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारले होते. त्यावर न्यायालयाने स्थगिती आणली. आता बदलापूर प्रकरणाच्या निषेधार्थ नेते तोंडावर काळी पट्टी बांधून आंदोलनास उतरले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी पुण्यात मूक आंदोलन केले. या मूक आंदोलनात त्यांनी कार्यकर्त्यांना शपथ घ्यायला लावली.
शरद पवारांनी पुणे स्टेशन पुसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन केले आहे. शरद पवारांनी तोंडावर काळ्या रंगाचा मास्क आणि दंडावर काळी पट्टी लावली होती. आंदोलनानंतर त्यांनी भाषणात कार्यकर्त्यांना शपथ दिली.
ते म्हणाले, मी अशी शपथ घेतो की, स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला मी कधीही खपवून घेणार नाही. माझे घर, माझे जावं, माझे कार्यालय कुठेही महिलांची छेद काढली जात असेल किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार होत असेल त्याला मी विरोध करून आवाज उठवेन. मुलगा मुलगी भेद करणार नाही. महिलांचा सन्मान राखेंन. पुण्यातच नव्हे र संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी सुरक्षित आणि भयमुक्त स्थिती बनवेन. अशी शपथ शरद पवारांनी वाचली त्यानंतर कार्यकर्त्यांनी शपथ घेतली.