Publish Date: Sun, 17 Mar 2024 (16:07 IST)
Updated Date: Sun, 17 Mar 2024 (16:10 IST)
पुण्यातील इंदापूरात एका हॉटेल मध्ये एकाची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या गोळीबारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचे प्राथमिक तपासात वर्तवण्यात येत आहे. अविनाश धनवे असे या मयत तरुणाचे नाव आहे. अविनाश हा आळंदी परिसरात वास्तव्यास होता.
सदर घटना इंदापूर बायपास वरील एका हॉटेल मध्ये घडली. अविनाश या हॉटेल मध्ये आपल्या मित्रांसह जेवण्यास गेला होता. या वेळी दबा धरून बसलेल्या काही अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला केला. या घटनेत गोळीबार करण्यात आली या मध्ये अविनाशच्या डोक्यात गोळी लागली. आणि त्याचा मृत्यू झाला.हा गोळीबार कोणी केला हे अद्याप समजू शकले नाही.
या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास करत आहे.