प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर हत्या कोणी केली याचा शोध सुरु असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. संतोष जाधवचं नाव पुणे मंचरमधील गुन्हेगार ओंकार उर्फ़ राण्या बाणखेलेच्या हत्या प्रकरणात समोर आलं होतं. ओंकारच्या हत्या प्रकरणात संतोष जाधव फरार आहे. पुणे क्राइम ब्रांच संतोषचा शोध घेत आहे. संतोष जाधवनं सूर्य उगवताच तुला संपवून टाकीनअसं स्टेटस टाकलं होतं. तेव्हापासून संतोष फरार आहे. आता त्याचं नाव सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात देखील समोर आलं आहे. गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणा आता पुण्यातून कनेक्शन असल्याची माहिती मिळत आहे.
सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या दोन जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस पाठवण्यात आली आहे. सौरभ महांकाळ आणि संतोष जाधव अशी संशयीतांची नावे असून हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे समजते आहे. (crime news pune)
दोन वर्षापासून खून केल्यानंतर संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ फरार आहेत. हे दोघंही पंजाबमध्ये राहत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. हे दोघे ही लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीमधले असल्याचे समोर आलं आहे.