सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकरण जास्तच वाढत आहे. रावेत येथे एका संगणक अभियंत्याची 7 लाखाची फसवणूक करण्यात आली.हे प्रकरण 4 ते 7 डिसेंबर कालावधीचे आहे. फसवणुकीचे प्रकरण ऑनलाईन माध्यमातून झाले आहे.
पीडितसॉफ्टवेअर इंजिनिअरला फोन कॉल आला आणि त्याने एका कुरियर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले आणि तुमच्या नावाने एका पार्सल सिंगापूरला पाठवले आहे आणि त्यात अमली पदार्थ आढळले आहे.त्यांनतर अज्ञात व्यक्तीने पीडित कडून वेगवेगळ्या कारणाने 7 लाख रुपयांची मागणी करत फसवणूक केली.
पीडित ने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलीस पुढील तपास करत आहे.