Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरोग्य विज्ञान विद्यापीठात होणार अत्याधुनिक लॅब; या संस्थेबरोबर केला सामंजस्य करार

madhuri kanitkar
, शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (22:07 IST)
जेनेटिक लॅबच्या माध्यमातून समाजोपयोगी संशोधन करण्यासाठी विद्यापीठाने भारतीय औषध संशोधन संस्थेसमवेत सामंजस्य करार करुन पुढाकार घेतला असल्याचे प्रतिपादन मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांनी केले.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने भारतीय औषध संशोधन संस्था (IDRL) समवेत सामंजस्य करार केला आहे. जेनेटिक आणि मॉलीक्युलर बायोलॉजी विषयात व्यापक संशोधन व्हावे यासाठी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या मार्गदर्शनाखाली मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण व पुण्याचे भारतीय औषध संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास जोशी यांच्या उपस्थितीत सदर सामंजस्य करार करण्यात आला.
 
याप्रसंगी व्यासपीठावर कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, आय.डी.आर.एल.चे विश्वस्त श्री. आर.जी. शेंडे, खजिनदार मंदार अक्कलकोटकर आदी मान्यवर उपस्थित होते. मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, विद्यापीठाचे पुणे येथील विभागीय केंद्र विस्तारीत करणे तसेच डिपार्टमेंट ऑफ जेनेटिक्स, इम्युनॉलॉजी, बायोकेमिस्ट्री अँड न्युट्रिशन विभागाच्या अंतर्गत जेनेटिक आणि मॉलीक्युलर बायोलॉजी विषयात अधिक संशोधन व्हावे याकरीता ’स्वर्गीय डॉ. के.सी. घारपुरे’ यांच्या नावाने प्रयोगशाळा संचलीत करण्यात येणार आहेे. भारतीय औषध संशोधन संस्थेच्या सहकार्याने शिक्षण, संशोधन, प्रभावी प्रात्यक्षिके आदींचा विस्तार करण्यात मदत होणार आहे. जेनेटिक व मॉलीक्युलर बायोलॉजी क्षेत्र यामध्ये संशोधन कार्याला मोठा वाव आहे मात्र त्यासाठी सुसज्ज लॅब व अनुषंगिक बाबी आवश्यक असतात. यासाठी विद्यापीठाने सामंजस्य करार केला असल्याचे त्यांनी सांगितले.
 
त्या पुढे म्हणाल्या की, या करारातर्गंत पुण्याच्या शिवाजी नगर परिसरातील डॉ. घारपुरे यांच्या निवासस्थानाचा काही भाग कॅन्सर रोगावरील संशोधन व क्लिनीकल रिसर्च करीता जेनेटिक अँड मॉलीक्युलर लॅबरॉटरी आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे उभारण्यात येणार आहे. उत्तम व अत्याधुनिक पध्दतीच्या क्लिनीकल आणि रिसर्चच्या सुविधा या लॅबच्या माध्यतातून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या लॅबमध्ये मॉलीक्युलर बायोलॉजी, बायोकेमिक आणि कायटोजेनेटीक तपासणींची सुविधा उपलब करुन देण्यात येणार आहे. यामध्ये कॅरिओटायपिंग, फिश, न्यू बॉर्न स्क्रिनींग,एच.पी.एल.सी. फोर थॅलेसिमिया, मॉलीक्युलर टेस्टींग फोर अंकोपॅनल, कारर्डिक रिस्क पॅनल, डायबेटीक रिस्क पॅनेल आदी चाचण्या घेण्यात येणार आहेत. या लॅबच्या माध्यमातून कॅन्सर रोगावर औषध व उपचार पध्दतीत संशोधनाला चालना देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. या माध्यमातून विविध शैक्षणिक व संशोधन अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. प्रामुख्याने एक वर्षाचा जेनेटिक डायग्नोसिस फोर क्लिनीशिअन्स फेलोशिप अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. याचबरोबर सहा महिन्याचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, या सामंजस्य कराराच्या माध्यमातून सटीफिकेट कोर्स इन जेनेटिक डायग्नोसिस या अभ्यासक्रमात वीस विद्यार्थ्यांची क्षमता असून डाग्नोस्टिक टेक्नीक्स यामध्ये शिकविल्या जाणार आहेत. सॅम्पल कलेक्शन, रुटीन लॅबवर्क, सायंटिफिक रेकॉर्ड मेंटेनन्स आदी बाबी शिकविल्या जाणार आहेत. यातून अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण केलेले विद्यार्थी आरोग्य विषयक सर्वेक्षण, संशोधन यामध्ये हेल्थडाटा गोळा करणे त्याचे पृथ्थकरण करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि ते मांडणे याबाबत हे विद्यार्थी कार्य करु शकतील.ते पुढे म्हणाले की, एक वर्षाचा जेनेटिक डायग्नोसिस फोर क्लिनीशिअन्स फेलोशिप अभ्यासक्रमासाठी दहा विद्यार्थी प्रवेशक्षमता आहे. यासाठी आरोग्य विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवी अशी पात्रता आहे. हे विद्यार्थी मेडिकल हिस्ट्री, डेव्हलपमेंटल अँड रिप्रोडक्टीव हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री यांचे निरीक्षण व रेकॉर्ड मेंटेनन्स, रुग्णांसाठी कोणत्या जेनेटिक टेस्टची आवश्यकता आहे त्याचे निदान, जेनेटिक टेस्टचे रिपोर्ट समजून घेणे आणि त्याचे विश्लेषण करुन रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधणे, सायकोलॉजीकल सपोर्ट देणे, रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणे याचबरोबर जेनेटिक डाग्नोटिक्सचे विविध तंत्र या विद्यार्थ्यांना शिकविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर, सध्या वेगवेगळ्या अनेक प्रकरणांत अडकलेले आहेत.