Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सांगवी आणि चिंचवड परिसरात सुरु असलेला घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार तब्बल 22 जणांना ताब्यात

सांगवी आणि चिंचवड परिसरात सुरु असलेला घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार तब्बल 22 जणांना ताब्यात
, शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (21:58 IST)
सांगवी आणि चिंचवड परिसरात सुरु असलेला घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने उघड केला आहे. तब्बल 22 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 381 गॅस सिलेंडरच्या टाक्यांसाह 24 लाख 49 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
सांगवी आणि चिंचवड परिसरात भारत गॅस कंपनीची भैरवनाथ गॅस एजन्सी आणि एचपी गॅस कंपनीची कांकरिया गॅस एजन्सी मधील कर्मचारी एका गोडाऊनमधून दुस-या गोडाऊनमध्ये सिलेंडरच्या टाक्या नेऊन तिथे भरलेल्या सिलेंडर टाक्यातून रिकाम्या सिलेंडर टाक्यांमध्ये गॅस काढत आहेत.
 
गॅस काढून भरलेल्या टाक्या चढ्या दराने बाजारात विकत आहेत, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार चार पथके तयार करून सामाजिक सुरक्षा विभागाने शनिवारी पहाटेपासून चार ठिकाणी कारवाई केली.
 
पहिल्या पथकाने मोरया पार्क, पिंपळे गुरव, सांगवी या ठिकाणी एकूण 165 गॅस सिलेंडर टाक्या, सात तीन चाकी ॲपे टेम्पो, गॅस रिफीलींग करण्याचे साहित्य, 11 मोबाईल फोन असा एकूण 12लाख एक हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये शंकरपाल अर्जुनराम चौधरी (वय 28, रा. ममता नगर, जुनी सांगवी) व इतर नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
दुसऱ्या पथकाने जांभुळकर पार्क, सांगवी येथे कारवाई करून 119 गॅस सिलेंडर टाक्या,चार तीन चाकी ॲपे टेम्पो, गॅस रिफीलींग करण्याचे साहित्य, रोख रक्कम, पाच मोबाईल असा एकूण सात लाख 24 बाजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये होतमसिंग यशपालसिंग ठाकुर (वय 23, रा. जांभुळकर पार्क, पिंपळे गुरव, सांगवी) आणि अन्य पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तिसऱ्या पथकाने कृष्णराज कॉलनी, मोरया पार्क, सांगवी येथे कारवाई केली. यात 63 गॅस सिलेंडर टाक्या, दोन तीन चाकी ॲपे टेम्पो, गॅस रिफीलींग करण्याचे साहित्य, रोख रक्कम, चार मोबाईल असा तीन लाख 38 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये सुनिलकुमार भगवान बिश्नोई (वय 30, रा. भावनगर, पिंपळे गुरव) आणि इतर तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
चौथ्या पथकाने गांगुर्डेगनर,पिंपळे गुरव येथे कारवाई केली. यात 34 गॅस सिलेंडर टाक्या, एक तीन चाकी ॲपे टेम्पो, गॅस रिफीलींग करण्याचे साहित्य, दोन मोबाईल फोन असा एकूण एक लाख 75 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
प्रमोद राजवीर ठाकुर (वय 42, रा. गांगुर्डेनगर, नवी सांगवी) आणि अन्य एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चार ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये एकूण 381 गॅस सिलेंडर टाक्या, गॅस रिफीलींग करण्याचे साहित्य, रोख रक्कम, 14 तीन चाकी ॲपे टेम्पो, 22 मोबाईल फोन असा एकूण 24 लाख 49 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 22 जणांना ताब्यात घेतले आहे.
 
प्रत्येक गॅस सिलेंडरच्या टाकीमधून एक ते दोन किलो गॅस काढून घेतला जात होता. त्यानंतर काढून घेतलेला गॅस टाक्यांमध्ये भरून पुन्हा त्याची चढ्या दराने विक्री केली जात होती. हे रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केले आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार