Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे येथे भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू

पुणे येथे भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू
, मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (11:57 IST)
पुण्यातील नवले पुला जवळ भीषण अपघात होऊन या अपघातात तिघांचा मृत्यू झाला .उतारावर कंटेनर मागे सरकत असताना मागून येणाऱ्या वाहनांची धडक बसल्याने हा अपघात झाला.
साताऱ्याकडे जाणाऱ्या कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि हा कंटेनर उताराच्या दिशेने मागे सरकत गेला. या कंटेनरची धडक लागून अन्य वाहनांचा अपघात झाला. या मध्ये काही दुचाकी तर काही चार चाकी वाहने आहेत. 
पुणे सातारा महामार्गावर हा अपघात सकाळी सव्वा नऊ वाजता झाला. या अपघातात गाडीची वाट बघत उभे असलेले तिघे या कंटेनरच्या खाली चिरडले गेल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्या सर्व लोकांना सावध राहण्याचे आवाहन