Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता घ्या, चक्क दुधाच्या टॅँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक

आता घ्या, चक्क दुधाच्या टॅँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक
, मंगळवार, 14 एप्रिल 2020 (15:24 IST)
पुण्यात चक्क एका दुधाच्या टॅँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक केली जात असताना हा टँकर पोलिसांनी कात्रज भागात पकडला आहे. भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांनी काल रात्री कात्रज परिसरात टेम्पोतील २९ हजार रुपयांचे बिअरचे १२ बॉक्स पकडले आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालकाला ताब्यात घेत टेम्पो जप्त करून भारती विद्यापीठ पोलिसांकडे देण्यात आला आहे.
 
लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा जसे दूध, भाजीपाला, किराणा वस्तू आणि मेडिकल सेवा सुरू असून त्यांना पोलिसांकडून पास देण्यात आले आहेत.यावेळी रात्री भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस कात्रज घाट परीसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार पारखी, तोंडे यांच्यासह पोलीस नाईक भिंगारे यांना एक दुधाचा टेम्पो संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबविले. चालकाकडे चौकशी केली असता तो खोट बोलत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदरचा प्रकार उघड झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज ठाकरे यांनी लक्षात आणून दिली 'ही' महत्वाची गोष्टी