Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जाधववाडी येथे ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार

Webdunia
सोमवार, 25 नोव्हेंबर 2024 (20:22 IST)
चिखली परिसरातील जाधववाडी येथे एका ट्रकची दुचाकीला जोरदार धड़क दिल्यामुळे अपघात घडला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यु झाला. अपघातानान्तर ट्रक चालक पसार झाला. त्याला चिखली पोलिसांनी अटक केली आहे.

सदर अपघात शनिवारी सायंकाळी घडला. या अपघातात गणेश शहाजी देशमाने आणि हनुमंत जीवन धारवडकर अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी अनिकेत शहाजी देशमाने (वय 26, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ गणेश देशमाने आणि त्यांचा मेहुणा हनुमंत धारवडकर हे दुचाकीवरून जात होते. ते सावतामाळी रोडवर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने 
धडक दिली. या अपघातात ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी ट्रक चालक पळून गेला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

लातूरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एकाला अटक

LIVE: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? शिंदेंच्या 'मोठ्या निर्णया'कडे सर्वांच्या नजरा

मेधा पाटकर यांचा ईव्हीएम वर आरोप,अनेक देशांनी वापर बंद केला म्हणाल्या

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? शिंदेंच्या 'मोठ्या निर्णया'कडे सर्वांच्या नजरा

मुंबईत मुलीला 'डिजिटल अरेस्ट' करून 1.7 लाखांची फसवणूक

पुढील लेख
Show comments