Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात अनोखे आंदोलन, प्रशासनाला स्वाधीन केल्या दुकानाच्या चाव्या

पुण्यात अनोखे आंदोलन, प्रशासनाला स्वाधीन केल्या दुकानाच्या चाव्या
, शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (23:34 IST)
पुण्यातील कोरोना निर्बंध कायम असल्याने व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरला आहे. पुण्यातील दुकानाची वेळ सकाळी १० ते रत्री ७ वाजेपर्यंत वाढवून द्यावी अशी पुणे व्यापारी महासंघातर्फ जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे. यासाठी शनिवारी शहरातील तब्बल दहा हजार व्यापा-यांनी आपल्या दुकानांच्या चाव्या प्रशासनाच्या 
स्वाधीन करत अभिनव पध्दतीने आंदोलन केले. 
 
राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये तसेच पुणे शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर व मृत्यू दर कमी झाला  असतानाही पुण्यातील निर्बंध कायम ठेवले आहेत.  यामुळे छोटे, मोठे व्यापारी त्रासले आहेत. त्यामुळे आता कारवाईची तमा न बाळगता त्यांनी शांततेने आंदोलन करण्यास सुरवात केली आहे. पोलिसांशी आम्ही वाद घालणार नाही पण व्यवसायासाठी दुकानेही बंद करणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी  घेतली आहे.
 
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दुकाने ४ वाजल्यानंतरही ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास सुरवात केली आहे.व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून,  कमी वेळेत, कमी व्यवसायात सर्व टॅक्स, जीएसटी, इन्कम टॅक्स, प्रॉप्रर्टी टॅक्स, लाईट बिल, कर्ज, बॅकेचे हप्ते, दुकान व घरभाडे, कर्मचारी पगार, घरखर्च भरून प्रशासनाने सद्य स्थितीत व्यवसाय चालवून दाखवावा असे आवाहन महासंघाने केले. 
 
यासाठीच शहरातील दहा हजारपेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांच्या चाव्या प्रशासनाकडे सुपूर्त करण्यासाठी व्यापारी महासंघाच्या स्वाधीन केल्या. या सर्व चाव्या प्रशासनाकडे सुपूर्त करण्यासाठी व्यापारी महासंघाच्या शिष्ठमंडळाने शनिवारी अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे यांची भेट घेतली. परंतु संजय शिंदे 
साहेब यांनी विनम्रपणे चाव्या स्वीकारण्यास नकार दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारत विरुद्ध इंग्लंड पहिली कसोटी: तिसऱ्या दिवशी फक्त 49.2 षटके खेळली गेली