Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात मोदी सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस कडून गॅस सिलेंडरचे अनोखे 'श्राद्ध 'आंदोलन

पुण्यात मोदी सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस कडून गॅस सिलेंडरचे अनोखे  'श्राद्ध 'आंदोलन
, शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (18:21 IST)
सणासुदीच्या काळात दोन वर्षांपासून मोदी सरकारने गॅस पेट्रोल,डिझेल चे दर वाढले आहे.सध्या गॅस सिलेंडर मध्ये तब्बल 15 रुपयांनी वाढ झाली आहे. या वाढीव दराचा निषेध म्हणून पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने गॅस सिलेंडरचे श्राद्ध घालत आज अनोखे आंदोलन केले.आता पर्यंत पुण्यातच नव्हे तर राज्यभरातून आंदोलनाच्या माध्यमातून महागाईचा विरोध राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीने केला आहे.

अनेक वेळा आंदोलन करून देखील केंद्र सरकार गॅस दरवाढ कमी करत नाही.या मुद्द्यावर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी ने पुण्यात व राज्यात आज चक्क गॅस सिलेंडरचे श्राद्ध घालत अनोखे आंदोलन केले.या वेळी केंद्रसरकार ने वाढवलेल्या महागाईचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले.त्या म्हणाल्या 'गेल्या दोन महिन्यापासून गॅसचे दर वाढले आहे.गॅसच्या सबसिडीच्या नावाने केंद्र सरकारला पैसे मिळत आहे.महागाईचा फटका सर्व सामन्याला पडत आहे. सामान्य माणसाचा विचार केंद्र सरकारने करायला पाहिजे.गॅस वाढीच्या दरातून सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला पाहिजे.या साठी आज आम्ही गॅस सिलेंडरचे श्राद्ध घालत आंदोलन करत आहोत.'   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

TATA-Air India: एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समूहाकडे