Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Vishrantwadi Pune : टँकरची दुचाकीला धडक होऊन अपघातात जुळ्या मुलींचा मृत्यू

Vishrantwadi Pune : टँकरची दुचाकीला धडक होऊन अपघातात जुळ्या मुलींचा मृत्यू
, मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (14:40 IST)
Vishrantvadi Pune: सध्या अपघाताचे सत्र पुन्हा वाढले आहे. पुण्यात विश्रांतवाडी चौका जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या इंधनाच्या टँकरने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात आई-वडिलांच्या डोळ्या समोर जुळ्या मुलींचा मृत्यू झाला तर आई वडील जखमी झाले आहे. 

मूळचा बिहारचा असणारा हा इसम आपल्या पत्नी आणि 3.5 वर्षाच्या जुळ्या मुलींना घेऊन मोटारसायकल वरून आळंदीला जात असताना विश्रांतवाडी चौकाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या इंधनाच्या टँकरने दुचाकीला धडक दिली त्यात या जुळ्या मुलींचा मृत्यू झाला आणि पालक गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास करत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इस्रायल गाझावर जमिनीवर हल्ला करणार का? शिजैया ऑपरेशनवर युद्ध गुन्ह्यांचा आरोप का करण्यात आला?