Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 24 March 2025
webdunia

पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊन होणार की नाही, वाचा पूर्ण सत्य

पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊन होणार की नाही, वाचा पूर्ण सत्य
, सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (08:28 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारकडून लॉकडाऊन पुकारण्यात आला होता . त्यानंतर टप्याटप्प्याने बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या आहेत. बाजारपेठा आणि व्यवहार सुरळीत होऊ लागले असताना पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याची अफवा सध्या शहरात पसरली आहे . त्यातून नागरिकांमध्ये विनाकारण घबराटीचे वातावरण पसरविले जात आहे. 
 
मात्र याबाबत पिंपरी चिंचवड शहरात सोमवारपासून कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लॉकडाऊनबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.तथापि सोशल मिडीयामध्ये प्रसारीत होत असलेल्या याबाबतच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याने यांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहनही हर्डीकर यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चिराग पासवान यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांचे खुले पत्र..काय म्हणाले आमदार रोहीत