Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडला पुराचा फटका का बसला?

पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडला पुराचा फटका का बसला?
, सोमवार, 5 ऑगस्ट 2024 (17:53 IST)
पिंपरी चिंचवड आणि परिसराला पावसाने झोडपल्यामुळे शहरातून वाहणाऱ्या पवना नदीला पूर आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर काही राजकीय नेत्यांनी पिंपरी चिंचवड शहराला भेट देऊन पुरस्थितीचा आढावा घेतला आहे. आज सकाळपासून पिंपरी चिंचवड शहर, लोणावळा आणि मावळ परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे.
आत्तापर्यंत पवना धरणातून आठ हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात आला असून यामुळे शहरातून वाहणाऱ्या नदीला पूर आला आहे.
 
अचानक आलेल्या पुरामुळे पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो कुटुंबं विस्थापित झाली असून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या 10 ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरातील पूरस्थिती गंभीर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनपाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळेतील निवारा केंद्रास भेट देण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे.
 
पिंपरी चिंचवड शहरामधून वाहणारी पवना नदी दुथडी भरून वाहत असल्याची माहिती आहे. तसेच परिसरातील मुळा आणि इंद्रायणी नदीला देखील पूर आल्याची माहिती आहे.
पिंपरी चिंचवडसह पुणे, नाशिक आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून 8 हजार क्यूसेक्सने होणारा विसर्ग आता 6 हजारांवर केला आहे.
 
मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. यामुळे इथल्या त्र्यंबकेश्वर मंदिरातसोबतच अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत.
 
⁠मालेगावच्या सवंदगाव शिवारात गिरणा नदीच्या पाण्यात 12-13 जण अडकले आहेत. त्यांना वाचवायला मालेगाव अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत.
 
हवामान विभागाने 5 ऑगस्टला नाशिकच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला आहे.
 
दुसरीकडे पुण्याच्या वेगवेगळ्या धरणांमधून पाणी सोडण्यात आल्यामुळे शहरातल्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातल्या एकता नगर परिसरात घराघरांमध्ये पाणी शिरलं आहे.
 
पुणे आणि परिसरातील धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 35948 क्युसेक्स विसर्ग कमी करून दुपारी12:00 वा. 21175क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो अशी सूचना खडकवासला पूर नियंत्रण कक्षाने दिली आहे.
 
05 ऑगस्ट रोजी 1.00 वाजता पानशेत धरणाच्या 8664 क्यूसेक विसर्गमध्ये कमी करून 3069 क्यूसेक सांडव्याद्वरे व 600 क्यूसेक विद्युत गृह निर्मिती द्वारे असा एकूण 3669 क्यूसेक करण्यात येणार आहे.
 
पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीपात्रात उतरू नये अशी विनंती पाटबंधारे विभागाने केली आहे.
तसेच वरसगाव धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 7491 क्युसेक्स विसर्ग दुपारी 1 वाजता पूर्णपणे बंद करून विद्युत गृह द्वारे 600 कयुसेक चालू ठेवण्यात येत आहे.
 
कोल्हापूर जिल्ह्यातील 63 बंधारे पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 63 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूरच्या राधानगरी धरणात 8.21 टीएमसी पाणीसाठा आहे.
कोल्हापूरमध्ये काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 24.7 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेख हसीना वाजेद आणि खालिदा झिया; बांगलादेशातलं राजकारण या दोघींभोवतीच असं फिरत राहिलं