Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिल्डरच्या मुलाला अटक होणार का?

pune accident
, बुधवार, 22 मे 2024 (15:05 IST)
पुणे पोलिसांनी बुधवारी सांगितले की, कल्याणी नगर अपघात प्रकरणात आईपीसी कलम 185 वाढ केली आहे. या अल्पवयीन आरोपीला आज परत किशोर न्याय बोर्ड समोर हजर केले जाणार आहे. या अल्पवयीन आरोपी विरोधात येरवडा पोलीस स्टेशनमध्ये कलम 185 नुसार दारू पिऊन गाडी चालवली म्हणून नवीन केस नोंदवण्यात आली आहे. ततपूर्वी त्याच्या विरोधात कलम 304 हत्या केल्याबद्दल केस नोंदवण्यात आली आहे. 
 
सर्वांना हा प्रश्न पडला आहे की, बिल्डरच्या मुलाला अटक होईल का? पण या अपघातात पोलिस ताबडतोब एक्शन घेत आहे. बुधवारी पोलिसांनी चौकशीनंतर या केस बद्दल आणखीन एक कलम वाढवली आहे. तसेच यासोबत या अल्पवयीन आरोपीला नोटीस पाठवण्यात आली आहे. आज या आरोपीला जुवेनाइल जस्टिस बोर्ड समोर हजर करण्यात येणार आहे. तसेच या आरोपीच्या वडिलांना देखील कोर्टात हजर करणार आहे. 
 
पोलिसांचे म्हणणे आहे की अपराध मोठा आहे. यामुळे आरोपींना माफी दिली जाणार नाही. पोलिसांनी या प्रकरणात सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती जिथे जामिनचा विरोध केला होता. तसेच उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यामध्ये घडलेल्या या अपघाताच्या दोषींना माफी मिळणार नाही. त्यांच्या वर योग्य ती कारवाई करण्यात येईल. 

Edited By - Dhanshree Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उजनी बोट अपघातात 6 जणांचा मृत्यू