पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये झिका विषाणूचा रुग्ण आढळला आहे. बेलसरच्या आजूबाजूच्या 79 गावांवर झिका व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.यामुळे आरोग्य प्रशासनाने या परिसरात अलर्ट जारी केलं आहे.पुण्यातील बेलसर गावातील 50 वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाली होती.
पुणे जिल्ह्यातील 79 गावांत झिका व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता आहे.या गावांत अलर्ट जारी केला आहे. स्थानिक प्रशासन आणि सर्व ग्रामपंचायत यांना खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आलेत.जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या गावांची यादीही जाहीर केली आहे. या 79 गावांत गेल्या तीन वर्षांपासून डेंग्यू,चिकनगुनियाचे रुग्ण आढळले आहेत.ही गावे झिका व्हायरससाठी अतिसंवेदनशील आहेत.त्यामुळं गावातील लोकं आणि अधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात.