Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मजिठियाने सिद्धूचे आव्हान स्वीकारले

मजिठियाने सिद्धूचे आव्हान स्वीकारले
, बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (10:16 IST)
अकाली दल नेते विक्रम सिंह मजीठिया यांनी सिद्धू यांना घेरण्याचा मोठा निर्णय घेतला असून ते आता एका जागेवरून लढणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी मजिठियाकडे ताकद असेल तर मजिठाची जागा सोडा आणि एका जागेवर लढा असे आव्हान दिले होते. आता मजिठिया यांनी सिद्धूचे हे आव्हान स्वीकारले आहे.
 
मजिठिया यांनी अमृतसर पूर्व मतदारसंघातूनच विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत आहे. ते म्हणाले की माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी मी अमृतसर पूर्व मतदारसंघातूनच विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांची पत्नी गणिव कौर मजिठा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे.

मजिठिया यांनी  म्हटले की ही निवडणूक नवज्योतसिंग सिद्धू यांचा अहंकार तोडण्याची निवडणूक आहे. मी त्यांना लोकांचा आदर करायला शिकवेन.
 
विक्रम सिंह मजिठिया हे मजिठा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत. सिद्धू यांनी आव्हान दिल्यानंतर सोमवारी त्यांनी मजिठामधून उमेदवारी मागे घेतली आणि पहिल्यांदाच त्यांची पत्नी गणिव कौर यांना उमेदवारी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत रात्रीचा कर्फ्यू संपला, जाणून घ्या इतर कोणते निर्बंध हटवले