साहित्य : 500 ग्रॅम कणीक, 250 ग्रॅम कोबी, आलं, 2 चमचे तिखट, 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, हिंग, तूप, कोथिंबीर, मीठ आवश्यकतेनुसार.
कृती : कणकेत 1 मोठा चमचा तूप टाकून त्याला चांगली भिजवावी. कोबीला थोडंसं उकळून त्याचा बारीक कीस करावा. नंतर त्यात तिखट, मीठ, हिंग, आलं, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर टाकून सर्व मिश्रण एकजीव करावे. कणकेचे लहान लहान गोळे करून त्यात कोबीचे सारण भरून खमंग परोठे तयार करावे. सॉस किंवा चटणी सोबत सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा