Article Punjabi Dishes Marathi %e0%a4%9b%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b2 109041800011_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छोला दाल

नारळ राईचे तेल पाणी चणा डाळ
ND
साहित्य : 1 मोठा चमचा तूप, 2 मोठे चमचे नारळ कापलेले, 2 मोठे चमचे राईचे तेल, 2 अख्ख्या सुक्या लाल मिरच्या, 2 तमाल पत्रे, 3 लवंगा, 1 तुकडा दालचिनी, 2 हिरव्या वेलच्या, 1/2 चमचा जिरे, 5 ग्रॅम आले चिरलेले, 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, 10 ग्रॅम गूळ किसलेला, 1 कप चणा डाळ धुतलेली, दीड चमचा मीठ, दीड कप पाणी.

कृती : तव्यात 1/2 मोठा चमचा तूप घालून 1 मिनिट गरम करा. नारळाचे तुकडे घाला आणि बदामी होईपर्यंत परतून बाजूला ठेवा. कुकरमध्ये तेल साधारण 2 मिनिटे गरम करा. तमालपत्र, लाल मिरच्या, लवंगा, दालचिनी, वेलच्या-आणि जिरे घाला. काही सेकंद ढवळा. पाणी व उरलेल्या तुपाशिवाय (1/2 मोठा चमचा) परतलेला नारळ आणि इतर सर्व पदार्थ घाला. ढवळा आणि साधारण 1 मिनिट परता. पाणी घाला आणि एकदा ढवळून 3 मिनिटे शिजवा. नंतर उरलेले तूप डाळीवर एकसमान घाला गरम गरम सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi