साहित्य : 1/2 वाटी मूगडाळ, चणाडाळ रात्री भिजत घाला. सकाळी त्यातील पाणी काढून मिक्सरमधून बारीक वाटा. 3 लवंगा, 5-6 मिरे, 4 वेलदोडे, 1/2 चमचा जिरे पूड, 2 मोठे चमचे तूप, मसाला, मीठ, कणीक.
कृती : सर्वप्रथम 2 मोठे चमचे तुपावर डाळी परता. मसाला मीठ घालून परतून कोरडे सारण करा. दोन वाट्या कणकेत चिमूटभर मीठ व दोन चमचे तूप घालून ती घट्ट भिजवा व अर्धा तास झाकून ठेवा. सारखे करून लिंबाएवढा गोळा घ्या. वाटी करून सारण भरा. पुर्या लाटा. तापलेल्या तुपात किंवा तेलात तळा. गरमागरम पुर्या सॉससोबत सर्व्ह करा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा