Article Punjabi Dishes Marathi %e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%80 %e0%a4%9b%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%87 109050900032_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंजाबी छोले

पंजाबी छोले पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 3 वाट्या काबुली चणे, 2 कांदे, 2 टोमॅटो चिरलेले, 2 हिरव्या मिरच्या, बोटभर आलं, 1 चमचा धणे, 1/2 चमचा जिरे, 4 लवंगा, दालचिनीचा तुकडा, 4 मोठ्या विलायची, 7-8 मिरे, 1/2 चमचे शाह जिरे, 3 तमालपत्रं, 1 चमचा तिखट, चिमूटभर हळद, 1 चमचा अणारदाणा, चिमूटभर सोडा, बारीक चिरून कोथिंबीर, 1 चमचा तूप, चवीप्रमाणे मीठ, 1/2 चमचा साखर.

कृती : अदल्या दिवशी रात्री गरम पाण्यात चिमूटभर सोडा घालून चणे भिजत ठेवावे. सकाळी त्याच पाण्यात तमालपत्र, वेलची, मिरे घालून चणे शिजवून घ्यावे. कांदे, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या वाटून घ्यावात. लवंग, दालचिनी, धने, जिरे, शाहजिरे या मसाल्याची पूड करून घ्यावी. उरलेला मसाला, वेलची, मिरे व तमालपत्र तुपावर परतावे. नंतर त्यात कांदा घालून परतावे. दोन मिनिट टोमॅटो घालून हलवावे. टोमॅटोच्या सुटलेल्या रसात हळद, तिखट, मसाला पावडर, दोन चमचे बारीक कुटलेला अनारदाणा घालावा. 3‍ मिनिटाने त्यात शिजलेले छोले, मीठ, गूळ पाणी घालून गॅसवर शिजत ठेवावे. उकळून दाटसर झाल्यावर खाली उतरवून कोथिंबीर भुरभुरावी. गरमागरम छोले भटुर्‍यासोबत सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi