साहित्य : 1/2 लीटर दूध, 750 ग्रॅम मावा, एक किलो साखर, 500 ग्रॅम तूप, केसर.
कृती : दूध उकळून त्यात खवा टाकून जलेबीचे मिश्रण तयार करावे. साखरेचा एक तारी पाक तयार करून त्यात केसर टाकावे. त्या मिश्रणाच्या जलेबी तूपात तळून घ्यावी. तयार जलेबी गरम पाकात काही वेळ ठेवून सर्व्ह कराव्या.