Article Punjabi Dishes Marathi %e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%95 %e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9f 109081000029_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पीक डिलाईट

पीक डिलाईट पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 2 अंडी, 2 कप दूध, अर्धा वाटी साखर, 1 चमचा बेदाणा, 1 चमचा काजू काप, 1/4 चमचा व्हॅनिला इसेन्स, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर.

कृती : अंड्यातील पिवळा व पांढरा भाग वेगळा करावा. अंड्यातला पांढरा भाग खूप फेसून घ्यावा. फ्राइंग पॅनमध्ये दूध व 1/4 वाटी साखर उकळायला ठेवावी. दुधाला उकळी आली की चमच्याने थोडा थोडा अंड्यातला पांढरा भाग त्यात टाकावा. जरा उकळू द्यावे. नंतर झाऱ्याने शिजलेला पांढरा भाग वेगळा काढावा.

थोड्या दुधात कॉर्नफ्लॉवर मिसळून घ्यावे. नंतर ते वरील दुधात घालावे. उरलेली साखर घालावी. अंड्यातला पिवळा भाग त्यात घालावा. मंदाग्नीवर असावे. व्हॅनिला इसेन्स घालावा. नंतर जरा दाटसर झाले की उतरवावे. डिशमध्ये अंड्यातला पांढरा भाग ठेवावा. त्यावर हे मिश्रण ओतावे. वरून काजू काप व बेदाणा घालावा. फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करून सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi