साहित्य : 500 ग्रॅम कणीक, 2-3 बारीक चिरलेले कांदे व हिरव्या मिरच्या, 2 चमचे तिखट, 1/4 वाटी कोथिंबीर, 10 ग्रॅम अनारदाण्याची पूड, तूप व मीठ चवीप्रमाणे.
कृती : कणीक प्रथम पिठाच्या चाळनीने चाळून त्यात एक मोठा चमचा तूप घालून मळून घ्यावी. नंतर त्यात कांदे, मिरच्या, कोथिंबीर, मीठ, तिखट अनारदाणा व पाणी घालून घट्ट भिजवून घ्यावी. त्यातील कणीक घेऊन गोळा करावा व पोरोठे लाटून बदामी रंगावर भाजून काढावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा