साहित्य : चार-पाच कांदे, एक कप नारळाचा चव, थोडी कोथिंबीर, आलं व हिरव्या मिरच्या वाटून दोन चमचे, मीठ, साखर, काजू तुकडा, बेदाणे, जिरेपूड, लिंबाचा रस, एक ब्रेड.
कृती : ब्रेड स्लाइस वाटीने गोल कापून, थोडे पंख्याखाली ठेवून सुकू द्या. थोडी फोडणी बनवून कांदा, आलं, मिरच्या परता. इतर साहित्य गार झाल्यावरच मिसळा. दोन स्लाइसमध्ये सारण भरून कडा पाण्यानं नीट चिकटवा किंवा मैद्याची पेस्ट लावून चिकटवा. तेलात तळून घ्या. टोमॅटो सॉसबरोबर द्या.