साहित्य : 41/2 कप पाणी, मीठ चवीप्रमाणे, 1 मोठा गोबीचे फूल देठ काढून तुरे वेगळे केलेला, 1 मोठा चमचा खसखस, 2 मोठे चमचे काजू तुकडे केलेले, 10 ग्रॅम आले, 6 पाकळ्या लसूण, 2 हिरव्या मिरच्या, 1/2 कप वनस्पती तेल, 2 मोठे कांदे किसलेलं, 2 मोठे टोमॅटो गरम पाण्यात सोललेले व चिरलेले, 1/2 लहान चमचा हळद पूड, 1 छोटा चमचा धणे पूड, 1/2 चमचा जिरे पूड, 1 छोटा चमचा तिखट, 1/2 कप दही, कोथिंबीर कापलेली.
कृती : 4 कप पाण्यात 2 चमचे मीठ घालून 1/2 तास फ्लॉवर भिजत ठेवा. थोडे थोडे पाणी घालून खसखस व काजूची पेस्ट करा. आले, लसूण व मिरच्यांचे वेगळे पेस्ट करा. कांदा चांगला परतून घ्या. आले-लसणाची पेस्ट, टोमॅटो, हळद, धणे, जिरे व मिरची यांची पूड, 1/4 पाणी आणि उरलेले मीठ घालून टोमॅटो चांगले शिजवून घ्या. त्यात 1 मोठा चमचा दही घाला ढवळा आणि दही एकजीव होईपर्यंत परता व नंतर उरलेले दही घालून परतून घ्या. नंतर त्यात फ्लॉवर घालून 5 मिनिटे परता काजूची पेस्ट व पाणी घालून चांगले ढवळून घ्या. व भाजीला 2 मिनिट शिजवून घ्या. नंतर त्यावर मसाला एकासमान ओता. कोथिंबीर घालून गरम गरम वाढा.