साहित्य : 50 ग्रॅम मावा, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बटाटा, 100 ग्रॅम फ्लावर तुरॅ दोन-तीन हिरव्या मिरच्या, मीठ, जिरेपूड.
कृती : अर्धी वाटी पाणी घालून काजूची मऊ पेस्ट मिक्सरमधून करून घ्यावी. खवा मिक्सरमदून मऊ करावा. फ्रायपॅनमध्ये काजू पेस्ट, मावा एकत्र करून परतावे. काजूपेस्टचा रंग तांबूस झाला की एक वाटी पाणी घालून मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून उकळावे. बटाटा उकडून मोठ्या फोडी करून ग्रेव्हीला घालाव्यात. फ्लावर तुरे थोडेसे उकडून निथळून ग्रेव्हीला घालावेत. जिरेपूड घालावी. पुरी पराठा सोबत मावा काजू ग्रेव्ही सर्व्ह करावी.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा