Article Punjabi Dishes Marathi %e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%be %e0%a4%91%e0%a4%a8 %e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f 109062700034_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रगडा ऑन टोस्ट

रगडा ऑन टोस्ट पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 2 कप पांढरे वाटाणे, 1/4 चमचा खायचा सोडा, 1 चमचा बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे चिरलेले टोमॅटो, 1 चमचा हिरवी मिरची व आल्याचे पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला 1 चमचा, 1 मोठी वेलची, 2 लवंगा, दालचिनी 1/2 इंचीचा तुकडा, मीठ चवीप्रमाणे, 1 चमचा लिंबाचा रस, 8 ब्रेडचे स्लाइस.

कृती : वाटाण्यांना रात्रभर भिजत ठेवावे. कुकरामध्ये पाणी, लवंगा, दालचिनी, मोठी वेलची आणि 1/2 चमचा मीठ टाकून गळेपर्यंत शिजवून घ्यावे. नंतर उकळलेल्या वाटाण्यांमधून लवंगा, दालचिनी व मोठी वेलची वेगळी काढून घ्यावी. त्यात कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चाट मसाला, मीठ इत्यादी सामग्री टाकून मिश्रण एकजीव करावे. रगडा (भाजी) तयार आहे. आता टोस्टरमध्ये ब्रेड भाजून त्यावर थोडीसी भाजी व कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi