भाजीसाठी साहित्य - एक लहान पत्ताकोबी, आठ ते दहा फरसबिन्सच्या शेंगा, गाजर, सिमला मिरची, कांदा, हिरव्या मिरची, पाच लसणाच्या पाकळ्या, आल्याचा लहान तुकडा.
ग्रेवीसाठी साहित्य - 2 मोठे चमचे तेल, तिखट, धने, 2 चमचे जिरे पूड, 1/2 चमचा हळद व गरम मसाला, 1/2 कप दूधाची साय, मीठ-साखर चवीनुसार, 4 चमचे टोमॅटो कॅचप.
सजविण्यासाठी : अननसाचे काप व चेरी.
कृती : पत्ताकोबी, बीन्स, गाजर आणि सिमला मिरचीच्या उभ्या खापा करून उकळून घ्या. कांदे आणि हिरव्या मिरचीचे उभे काप करून घ्या. कांदे, आलं आणि लसणाची बारीक पेस्ट करावी. तेल तापत ठेऊन त्यात वाटलेला मसाला परतून घ्यावा. त्या नंतर त्यात कापलेले कांदे, हिरव्या मिरच्या टाकून परतून घ्या. त्यात तिखट, हळद, धने, जिरे, गरम मसाला, साय व मीठ आणि साखर टाकून मसाला एकदा परतावा. त्यानंतर त्यात सगळ्या उकळलेल्या भाज्या, बेक्ड बींस व टोमॅटो कॅचप टाकून 3-4 मिनिटे शिजवावे. या भाजीत पाणी टाकयची गरज नसते. भाजी तयार झाल्यावर ती अननसाचे काप व चेरीने सजवता येते.