साहित्य : १ कप चण्याची डाळ, २ कांदे चिरून, अर्धा कप श्रावणघेवडा चिरून, थोडे जिरे, ३ लवंगा, १ दालचिनीचा तुकडा, १ हिरवी मिरची, २ वेलदोडे, पाणी.
कृती : सर्व एकत्र शिजवावे. कोरडे करुन पुरणाप्रमाणे वाटून घ्यावे. मीठ, आले, लसूण पेस्ट घालावी. सारणासाठी : थोडा खवा मोडून त्यात कोथिंबीर, काजू तुकडा, बेदाणे घालावे. पुरणाच्या वाटीत सारण भरून शॅलो फ्राय करावे. प्रत्येक कबाबवर कांद्याची एक रिंग ठेवून मधोमध थोडा टोमॅटो सॉस घालून द्यावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा