आपल्या अनोख्या निवेदन शैलीमुळे भारतीय राजकारणात सर्वांच्या कतुहलाचा विषय बनलेल्या रेल्वेमंत्री लालूप्रसाद यांनी निवडणूक पूर्व हंगामी रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेच्या प्रवाशी भाड्यात कपात करण्यासोबतच काही नवीन गाड्या सुरू करून निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.
या अर्थसंकल्पात लालूंनी केलेले दावे-
1. रेल्वेच्या मिळकतीत 19 टक्क्यांनी वाढ.
2. पाच वर्षात रेल्वे विकासाचा दर 8 टक्के.
3. गेल्या वर्षी 9 टक्क्यांच्या दराने माल वाहतुक वाढली.
4. आधीच्या तुलनेत अधिक क्षमतेचे नव्या डिजाईनचे रेल्वे वॅगन आणणार.
5. सहाव्या वेतन आयोगाचा फायदा 14 लाख कर्मचा-यांना झाला.
7. पूर्व फ्रंट कोरीडोरचे काम सुरू
8. दरवर्षी मालगाडीचे दहा हजार वॅगनचे उद्दीष्ट.
9. आम्ही रेल्वेचा कायाकल्प केला.
10. रेल्वेने 90 हजार कोटींचा नफा कमावला.
11. सामान्य माणसावर बोजा न टाकता रेल्वेचा विकास.
12. रेल्वेच्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यात आमच्या सरकारला यश आले.
13. आसन पध्दतीत बदल केल्याने लाखो रुपयांचा फायदा.
14. आगरतळा रेल्वे नेटवर्कशी जोडण्यात यश.
15. आगामी चार महिन्यात काश्मिरच्या बारामुल्लापर्यंत विस्तार.
16. पाच वर्षांत दोन लाख 30 हजार कोटी रुपयांची गुंतणूक.
हे करणार-
1. पाटणा ते दिल्ली बुलेट ट्रेन सुरू करणार
2. भागलपूर व ठाण्यात रेल्वेचे नवीन विभाग स्थापणार.
3. रेल्वेच्या प्रवाशी भाड्यात प्रत्येक तिकिटामागे एक रुपया कमी.
4. वातानुकुलीत रेल्वेच्या भाड्यात दोन टक्के कपात.
5. कोलकात्यात राज्य सरकारच्या भागीदारीने मेट्रो रेल्वे चालविणार.
6. 50 कि.मी. पर्यंतच्या प्रवाशी भाड्यात कपात.
7. दुस-या वर्गाच्या प्रवाशी भाड्यातही कपात.
8. सिकंदराबाद-मानगुरू व मुंबई-करवार नवीन सुपरफास्ट गाड्या सुरू होणार.
9. 43 नवीन सुपरफास्ट ट्रेन चालविणार.
अशा धावणार रेल्वे-
1. जम्मू-दरभंगा गरीब रथ साप्ताहिक
2. मुंबई-वाराणसी सुपरफास्ट रोज.
3. भोपाळ-लखनऊ गरीब रथ आठवड्यात तीन दिवस.
4. अमरावती-मुंबई दररोज.
5. आग्रा-अजमेर सुपरफास्ट रोज.
6. झाशी-छिंदवाडा दरम्यान नवीन रेल्वे.
7. बरौन-दिल्ली जनसाधारण एक्सप्रेस रोज.
8. भुनेश्वर-दिल्ली राजधानी एक्स. आठवड्यातून चार वेळा.
9. मुंबई-वडोदरा एक्सप्रेस उदयपूरपर्यंत जाणार.