संसदेच्या अधिवेशन आज हंगामी रेल्वे अर्थसंकल्प मांडला जाणार असून निवडणुका तोंडावर असल्याने रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव प्रवाशांना पर्यायाने मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न करतील.
लालू प्रसाद यादव यांनी गेल्या पाचवर्षांत भाडेवाढ न करता रेल्वे सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला असला तरी कर्मचारी भारती प्रश्नावरून जोरदार गदारोळ झाला आहे. याचे पडसाद संसदेत उमटण्याची शक्यता आहे. भाडेवाढ मात्र, कोणाची भाडभीड न ठेवता आपली 'गाडी' पुढे रेटणारे रेल्वेमंत्री यादव निवडणूक आयोगाला चकवा देऊन मतदारांना कसे खूश करतील? याकडे सा-यांचे लक्ष लागून राहिले आहे. यापूर्वी भाडेवाढ करण्यात आलेली नाही त्यामुळे आता भाडेकपात करणे अथवा कर्मचा-यांना नवीन पॅकेज देण्याचे पर्याय त्यांच्यासमोर आहेत.
दरम्यान, रेल्वे आणि सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या लेखा अनुदानाला मंजुरी मिळवणे हाच या अधिवेशनाचा मुख्य उद्देश असून नवे मार्ग जोडल्याची घोषणा करण्याबरोबरच काही नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येण्याची शक्यता आहे.