Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Rajasthan Election 2023 राजस्थानमध्ये काँग्रेसचा मोठा डाव, महिलांना वार्षिक 10,000 रुपये देण्याचे आश्वासन

Rajasthan Election 2023 राजस्थानमध्ये काँग्रेसचा मोठा डाव, महिलांना वार्षिक 10,000 रुपये देण्याचे आश्वासन
Big promise of Chief Minister Ashok Gehlot राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बुधवारी सांगितले की, राज्यात काँग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास 1 कोटी 5 लाख कुटुंबांना 500 रुपयांना एलपीजी सिलिंडर दिले जाईल आणि कुटुंबातील महिला प्रमुखाला 10 हजार रुपये मानधन दिले जाईल. 
 
ते म्हणाले, आमचे सरकार आल्यास एक कोटी पाच लाख कुटुंबांना पाचशे रुपयांना एलपीजी सिलिंडर मिळेल. कुटुंबातील महिला प्रमुखाला दरवर्षी 10,000 रुपये मानधन दिले जाईल. ते म्हणाले की, 'गृहलक्ष्मी गॅरंटी'च्या रूपात, कुटुंबातील महिला प्रमुखाला सन्मान चिन्ह म्हणून प्रतिवर्षी 10,000 रुपये हप्त्याने मिळतील.
 
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत झुंझुनू येथील अरदावता येथे जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. राज्यातील विधानसभेच्या 200 जागांसाठी 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टी राजा सिंह यांना तिकीट, तेलंगणात भाजपची पहिली यादी जाहीर