Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राखी विशेष : कसा साजरा करावा राखीचा सण, चला तर मग खास 5 गोष्टी जाणून घेऊ या.

राखी विशेष : कसा साजरा करावा राखीचा सण, चला तर मग खास 5 गोष्टी जाणून घेऊ या.
, शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (17:04 IST)
श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाच्या सणाला बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात. हा सण भाऊ-बहिणीच्या नात्याला बळकट किंवा दृढ करतो. चला तर मग जाणून घेऊ या राखीचा सण कसा काय साजरा करावा.
 
1 या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून देवाची पूजा करावी. नंतर सण साजरा करण्याची तयारी करावी. घराला स्वच्छ करा. नंतर कुंकू, अक्षता, नारळ, मिठाई आणि निरांजन लावून ताट तयार करा. या ताटात रंग-बेरंगी राखी ठेवून त्याची पूजा करा.
 
2 भावाला पाटावर बसवा आणि एखादा चांगला मुहूर्त बघून बहिणीने भावाच्या कपाळावर कुंकूच टिळा लावून त्यावर अक्षता लावा आणि भावाच्या उजव्या मनगटावर रेशीम दोऱ्याने बनलेली राखी बांधून मिठाई खाऊ घाला. बहिणी राखी बांधताना आपल्या भावाच्या दीर्घायुष्य, सुख आणि प्रगतीची मंगलमयी इच्छा करतात.
 
3 यंदा 3 ऑगस्ट 2020 रोजी राखी साजरी होणार आहे. राखी बांधण्याचा मुहूर्त सकाळी 9 वाजून 30 मिनिटापासून सुरू होणार आहे. दुपारी 1 वाजून 35 मिनिटांपासून संध्याकाळी 4 वाजून 35 मिनिटापर्यंतचा मुहूर्त शुभ आहे. त्या नंतर संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटापासून घेऊन रात्री 9 वाजून 30 मिनिटापर्यंत देखील चांगला मुहूर्त सांगत आहे. भद्राकाळात राखी बांधायची नसते.
 
शास्त्रानुसार राखी बांधताना या मंत्राचा जप करावा -  "येन बद्धो बलिराजा, दानवेन्द्रो महाबलः तेनत्वाम प्रति बद्धनामि रक्षे, माचल-माचल"
 
4 भावाने राखी बांधल्यावर आपल्या बहिणीला काही भेटवस्तू आणि पैसे द्या. थोरली बहीण असल्यास तिच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा. त्यांचा जीवनातील प्रत्येक संकटामध्ये नेहमीच तिचा साथ देण्याचे वचन द्या. मोठा भाऊ असल्यास बहिणीला आशीर्वाद द्यावा आणि बहिणीचे रक्षण करण्याचे वचन द्यावे.
 
5 ज्यांना बहिणी नाही किंवा ज्या बहिणींना भाऊ नाही त्यांनी आजच्या दिवशी मानस बहिणीकडून राखी बांधवून घ्यावी किंवा मानस भावाला राखी बांधावी. असे केल्यास शुभ फळ मिळतं. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rakhi festival 2020 : राखीच्या सणाला कुंकवाच्या तिळावर अक्षता का लावतात, जाणून घेऊ या....